Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • रितिक मामीडवार यांचा सत्कार
  • वणी

रितिक मामीडवार यांचा सत्कार

NewWaniDiary 27/12/2025

▪️दामले नगरातून तब्बल २२ वर्षांनंतर नगरसेवक..

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील प्रभाग क्र. ५ अनुसूचित जाती आरक्षित जागेतून निवडून आलेले नगरसेवक रितिक लक्ष्मण मामीडवार यांचा आज दि. २७ डिसेंबर रोजी माजी नगराध्यक्ष सुरेश रायपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना रायपुरे म्हणाले की, दामले नगरातून तब्बल २२ वर्षांनंतर नगरसेवक निवडून आल्याने आनंद व्यक्त होत आहे. निमकर कुटुंबाच्या सहकार्यामुळे तसेच प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे रितिक मामीडवार यांची निवड झाली आहे. नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे पूर्ण होणे आवश्यक असून विशेषत: वार्डातील पाणीटंचाईची गंभीर समस्या तातडीने मार्गी लावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी रायपुरे यांनी नगरसेवक रितिक मामीडवार यांना अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक भेट देऊन तसेच शाल परिधान करून सत्कार केला. कार्यक्रमाला वार्डातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: शिंदोला येथे शिवेचा मारोती यात्रा व रक्तदान शिबिर
Next: 1974 साली झालेल्या वणी गोळीबारातील हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व नातेवाईकांकडून श्रद्धांजली

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.