Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • दामले नगरातील पाणीप्रश्न मार्गी; नवीन ट्यूबवेल बोरच्या कामास सुरुवात
  • वणी

दामले नगरातील पाणीप्रश्न मार्गी; नवीन ट्यूबवेल बोरच्या कामास सुरुवात

NewWaniDiary 14/01/2026

▪️ वार्डातील नागरिकांना छोटू निमकर यांनी दिलेले आश्वासन पूर्ण होताना..

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ५, दामले नगर येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने नवीन ट्यूबवेल बोरच्या कामाचे भूमिपूजन आज दि. १४ जानेवारी २०२६ रोजी नारळ फोडून करण्यात आले. हे भूमिपूजन वणीच्या नगराध्यक्ष विद्या खेमराज आत्राम यांच्या शुभहस्ते पार पडले.

दि. १२ जानेवारी २०२६ पासून नवनियुक्त नगराध्यक्ष विद्या खेमराज आत्राम यांनी अधिकृतपणे नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नगर परिषदेचा कारभार सुरू झाला असून, या विकासकामामुळे दामले नगरातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

वणी शहरातील दामले नगर हा मागासवर्गीय (दलित) वस्तीत समाविष्ट असलेला परिसर असून, येथील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता या भागात विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. या अनुषंगाने नवीन ट्यूबवेल बोरच्या कामाचा शुभारंभ प्रभाग क्र. ५ च्या नगरसेविका सोनाली प्रशांत निमकर व नगरसेवक रितिक लक्ष्मण मामिडवार यांच्या पुढाकारातून करण्यात आला आहे. नागरिकांची अत्यंत महत्त्वाची असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यात आले आहे.

नगरपरिषद निवडणुकीदरम्यान दामले नगरातील अनेक नागरिकांनी तसेच माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपुरे यांनी वार्डातील बंद पडलेल्या सार्वजनिक बोरमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईबाबत माजी नगरसेवक छोटू निमकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. अनेक नागरिकांना साधनकरवाडी ग्रामीण भागात जाऊन लिकेज पाइपलाइनद्वारे पाणी भरावे लागत होते. त्या वेळी निवडणुका पार पडल्यानंतर सर्वप्रथम नवीन पाण्याचा बोर करून देण्याचे आश्वासन छोटू निमकर यांनी दिले होते. आज प्रत्यक्षात हे आश्वासन पूर्ण होताना दिसत आहे. यासोबतच बंद असलेले जुने बोर दुरुस्ती करून सुरू करण्यात येणार आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपुरे यांनी छोटू निमकर यांचे आभार मानले. तसेच छोटू निमकर यांनी पुढेही प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी वार्डातील महिलांच्या वतीने नगराध्यक्ष विद्या आत्राम यांचा सत्कार करण्यात आला.

या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन छोटू निमकर व नगरसेवक रितिक मामिडवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष तरेंद्र बोर्डे, माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपुरे, ॲड. निलेश चौधरी, माजी नगरसेवक छोटू निमकर, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश रायपुरे, रवी कोमलवार, गौतम जीवने, विलास भीमलवार, चंदाजी प्रेमकुंटलावार, रवी बंडलवार, देवेंद्र नागनवार, अभय भलमे यांच्यासह वार्डातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: ऐतिहासिक बुद्धभूमी; गडचांदूर येथे ८ जानेवारीला जागतिक धम्मध्वज दिन सोहळा
Next: गोरगरिबातून आलेला नेतृत्वाचा चेहरा; उपनगराध्यक्ष राकेश बुग्गेवार यांचा सत्कार

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.