Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • गोरगरिबातून आलेला नेतृत्वाचा चेहरा; उपनगराध्यक्ष राकेश बुग्गेवार यांचा सत्कार
  • वणी

गोरगरिबातून आलेला नेतृत्वाचा चेहरा; उपनगराध्यक्ष राकेश बुग्गेवार यांचा सत्कार

NewWaniDiary 17/01/2026

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तसेच पाणीपुरवठा समितीचे सभापती राकेश लक्ष्मण बुग्गेवार यांचा आज दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या गायकवाड फैल येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपुरे व माजी नगरसेवक सुरेश आसमवार दिनेश रायपुरे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

वय अवघे ४० वर्षे असलेले राकेश बुग्गेवार हे एका गरीब कुटुंबातून संघर्ष करत या पदापर्यंत पोहोचले आहेत. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी वणी बसस्थानकावर पॉपकॉर्न विक्रीचे काम केले. जवळपास पाच ते सहा वर्षे बसस्थानक परिसरात विविध कामे करून त्यांनी आपला उदरनिर्वाह केला. त्यानंतर गायकवाड फैल येथील ठेकेदार सुरेश आसमवार यांच्या हाताखाली सुपरवायझर म्हणून काम केले. काही काळ विटभट्टी व्यवसायात कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी स्वतःची ठेकेदारी सुरू केली.

राकेश बुग्गेवार हे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे विश्वासू कार्यकर्ते असून त्यांना बोदकुरवार यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले आहेत. त्यांनी अनेक निवडणुका लढविल्या. सुरुवातीला नगरसेवक पदासाठी अपक्ष म्हणून दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. मात्र २०१६ मध्ये ते प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २१ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून दिग्गज उमेदवारांना पराभूत करत ते पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून आले.

यानंतर दि. १२ जानेवारी २०२६ रोजी ते बिनविरोध वणी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यांच्या निवडीमुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये, मित्रपरिवारात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२०१६ मध्ये निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींनी गोरगरीब वस्तीतील विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र आज गरिबातून आलेला एक सामान्य माणूस उपनगराध्यक्षपदावर कार्यरत असल्याने, शहरातील मागास, दलित वस्तीतील विकासकामांना चालना मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Continue Reading

Previous: दामले नगरातील पाणीप्रश्न मार्गी; नवीन ट्यूबवेल बोरच्या कामास सुरुवात
Next: ॲड. ट्विंकल गोहणे यांना गोंडवाना विद्यापीठाचे सुवर्णपदक; वणी वकील संघाकडून सत्कार

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.