Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • बोरगांव–मेढोली जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
  • वणी

बोरगांव–मेढोली जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

NewWaniDiary 29/01/2026

वणी (प्रतिनिधी): वणी तालुक्यातील बोरगांव–मेढोली येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या वतीने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी हनुमान मंदिर येथे पोलीस पाटील प्रदीप बलकी, ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रियांकाताई कोल्हे तसेच जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र देरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

दुपारच्या सत्रात गावातील महिलांसाठी मैदानी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कला प्रकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच प्रियांकाताई कोल्हे, उपसरपंच पद्माकर देरकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, युवा मित्र मंडळ, महिला बचत गट तसेच समस्त ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक के.डी. उईके यांनी केले. सूत्रसंचालन बी.एच. जुनघरे यांनी तर आभार प्रदर्शन सहायक शिक्षक घागी यांनी मानले.
शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Continue Reading

Previous: प्रजासत्ताक दिनानिमित्त मयूर मार्केटिंग येथे महाभव्य रिपब्लिक डे सेल – टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीनवर भरघोस सवलती
Next: गणराज्य दिनानिमित्त हरदोना खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम; अनैशा वाहन चालक कामगार संघटनेतर्फे शिक्षकांचा सत्कार

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.