Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026

वणी (प्रतिनिधी) : भीम टायगर सेना, वणी तालुका यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य भीम गीतांचा कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

त्यानंतर रात्री ११:५९ वाजता केक कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बस स्टँड समोर, वणी येथे धर्मभोजन आयोजित करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ६:३० वाजता सर्व रॅलीचे भव्य स्वागत व सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप
Next: गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण

Related Stories

SAVE_20260720_214841
  • वणी

दामले फैल परिसरात मच्छरनाशक फवारणी; सार्वजनिक शौचालय दुरुस्तीचे काम दिवाळीत सुरू होणार

NewWaniDiary 20/07/2026
ChatGPT Image Jul 19, 2026, 09_55_43 PM_11zon
  • वणी

जि. प. उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी डिजिटल शाळा, चिखलगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न

NewWaniDiary 19/07/2026
ChatGPT Image Jul 17, 2026, 10_34_41 PM_11zon
  • वणी
  • पृथ्वीरक्षण

वणीतील वाढती उष्णता : विकास झाला; पण सावली कुठे?

NewWaniDiary 17/07/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.