Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • विदर्भ
  • मोहित झोटिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिर
  • विदर्भ

मोहित झोटिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिर

NewWaniDiary 15/08/2026

राळेगाव (प्रतिनिधी) : दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था, वडकी आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय मोहित राजेंद्र झोटिंग यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य मोफत रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सोनामाता हायस्कूल, चहांद येथे हे शिबिर उत्साहात पार पडले.

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झोटिंग हे दरवर्षी स्वर्गीय मोहित यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक बांधिलकीतून विविध सेवाभावी उपक्रम राबवितात. नऊ वर्षांपूर्वी सिकलसेल आजाराने मोहित झोटिंग यांचे निधन झाले होते. आपल्या एकुलत्या एका मुलाचे देहदान नागपूर मेडिकल कॉलेजला करून राजेंद्र झोटिंग यांनी त्यांच्या स्मृती जपण्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा सुरू ठेवली आहे.

शिबिराचे उद्घाटन हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू तिमांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल मानकर होते.

यावेळी शेतकरी संघटना उद्योजक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय निवल, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाडे, पोलीस निरीक्षक सुखदेवजी भोरकडे, गजानन पारखी, अंकुशराव मुनेश्वर, भास्करराव महाजन, मनोज पाचघरे, पोपट, धनंजय जवादे, चारुदत्त पाटील, सोनामाता हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अनिल धोबे, राहुल पाटील, योगेश देवतळे, बबनराव चौधरी, गिरीश तूरके, गजानन ठाकरे, किशोर झोटिंग, अक्षय महाजन, कृष्णाजी कुबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय मोहित झोटिंग यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे, वर्धा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांची तपासणी करून रोगनिदान व उपचार करण्यात आले. तसेच लायन्स ब्लड सेंटर, वर्धा यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले.

शिबिरात पंकज भुसारी, प्रकाश मसकर, कुणाल इंगळे, शुभम झोटिंग, प्रथमेश राऊत, देवानंद सोनवणे, किसना ऊईके, भास्कर पाटील, सिद्धार्थ पाटील, डॉ. पंकज टापरे, अजय भोयर, अतुल दांडेकर, सुरेश खडसे, ऋषभ झोटिंग, सौरभ सातोकर, संचित घुगरे, वृषभ गुरनूले, प्रवीण खेवले, संदीप चोपडा, गोपाल बचाटे, राहुल वडपल्लीवार आदींनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पंकज टापरे यांनी केले. संचालन सतीश सावंत यांनी केले, तर आभार राजेंद्र कुमार कांबळे यांनी मानले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी सोनामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश चिव्हाने, अतुल दांडेकर, प्रशांत अहिरकर, राजेश भोयर, कलावती ठाकरे, शंकर जोगी (फ्रुटवाले), भास्कर पाटील, प्रथमेश राऊत, गजानन कोल्हे, ज्ञानेश्वर सलाम, विठ्ठल खोंडे, देवानंद सोनवणे तसेच दत्तकृपा बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Continue Reading

Previous: मारेगाव शहरातील वारंवार वीजखंडितीने नागरिक त्रस्त; सात दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
Next: राजीव गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

Related Stories

SAVE_20260625_124646
  • विदर्भ
  • वणी

महाराष्ट्र आर्थिक संकटात; राज्यावर 12 लाख कोटींपेक्षा अधिक आर्थिक बोजा – ॲड. वामनराव चटप

NewWaniDiary 25/06/2026
SAVE_20250929_143042_11zon
  • विदर्भ

नागपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळावा

NewWaniDiary 29/09/2025
SAVE_20250612_181122
  • विदर्भ

शेतकरी, शेतमजूर व दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या बच्चु कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा!

NewWaniDiary 12/06/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.