
वणी (प्रतिनिधी) : भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरातील राजीव गांधी चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राजीवजी गांधी हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिलेले दूरदृष्टीचे नेते होते. भारताला आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगाकडे नेण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. संगणक व आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत त्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा दिली.
यावेळी स्व. राजीव गांधी यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शहरातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

