▪️ गांजा, चरस, एमडी, हेरॉईन, कोकेनसह अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतुकीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन..

वणी (प्रतिनिधी) : अंमली पदार्थांचा अवैध व्यापार, विक्री, साठवणूक, वाहतूक व सेवनामुळे विशेषतः युवकांच्या आरोग्यावर आणि भविष्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अंमली पदार्थांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलिसांकडून सातत्याने प्रभावी कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वणी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात गांजा, चरस, मेफेड्रॉन (MD), हेरॉईन, कोकेन किंवा इतर अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक अथवा वितरण होत असल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिसांना द्यावी. माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, ठिकाण, वाहन क्रमांक तसेच अंमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक होण्याची वेळ व ठिकाण याबाबत उपलब्ध माहिती पोलिसांना कळवावी.
माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी कोणतीही भीती अथवा संकोच न बाळगता अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांच्या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन वणी पोलिसांकडून करण्यात आले आहे. हे आवाहन दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पोलीस वार्तापत्रातून करण्यात आले आहे.

