
मारेगाव (प्रतिनिधी) : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांच्या सन्मानार्थ मारेगाव येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यमान आमदार संजय देरकर, किरणताई देरकर आणि विजयी संचालक सुनील कातकडे यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यवतमाळ येथे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. मारेगाव येथे आगमन झाल्यावर रायपुरे परिवाराच्या निवासस्थानी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत विजयी संचालकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी रायपुरे परिवाराचे प्रमुख अजय रायपुरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. शेतकरी आर्थिक आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असताना सहकारी बँकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित संचालकांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन आर्थिक मदत, योग्य मार्गदर्शन आणि शेतकरी हिताच्या निर्णयांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
“शेतकरी जगला तरच भारत जगेल!” या संदेशातून त्यांनी सहकार क्षेत्राने ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या स्वागत सोहळ्याला जिल्हाध्यक्ष संजय निखाडे, अनिल पाटील देरकर, नगराध्यक्ष मनीष मस्की, जितेंद्र नगराळे, वर्षाताई किंगरे, मालाताई बदकी, इंदुताई किन्हेकार, विमलताई उरकुडे, ऐश्वर्या किंगरे, सुरेखाताई भेले, तालुकाध्यक्ष प्रमुख बुट्टे, अभय चौधरी, करण किंगरे, प्रशांत पाचभाई, सचिन पचारे, राजू मोरे, बदरुद्दीन सय्यद, सुभाष बदकी, समाधान पवार, अमोल झोटिंग, अविनाश भाजपाले, विकी येरमे, सचिन पसारे, दिवाकर सातपुते, विनोद ढुमणे, विजय अवताडे आणि सचिन टोंग यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.

रायपुरे परिवारातर्फे विजयी संचालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्याच्या माध्यमातून शेतकरी हित आणि सहकार क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला.
