
वणी (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा, वणी तालुका यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे सामुदायिक त्रिशरण व पंचशील वंदना घेण्यात आली. यावेळी विश्वरत्न बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.
न्यू वणी डायरी न्यूज पोर्टल
