▪️ शहरातील अनेक गंभीर गुन्हे करणारे व्यक्ती खुलेआम वावरत..

वणी (प्रतिनिधी) – वणी शहरातील मोमीनपूरा येथील रहिवासी, समाजसेवक व “आमेर बिल्डर्स”चे संचालक जमीर उर्फ जम्मू खान महेबूब खान यांच्यावर दिनांक ९ जून रोजी महाराष्ट्र प्रतिबंधक गुन्हेगारी कायदा (MPDA) अंतर्गत एक वर्षाकरिता स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
मात्र ही कारवाई राजकीय दबाव आणि कटकारस्थानातून घडवली गेली असून, यामागे काही सट्टेबाज गट आणि स्थानिक राजकीय हस्ती असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे विदर्भात खळबळ उडाली असून, अनेक शहरातील व वणीतील संतापाची लाट उसळली आहे.
जम्मू खान हे समाजसेवक म्हणून ओळखले जात असून, त्यांनी शेकडो कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवलेला आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले असून, जम्मू खान हे निर्दोष असून त्यांच्या विरोधकांचे हे एक सुनियोजित षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. शहरातील मोमीनपूरा वार्ड अल्पसंख्यांक असून जम्मू खान यांचे वार्डात एका वेक्ती सोबत आपसी वाद सुरु होते, त्याच तक्रारीचा वापर करून ही कारवाई करण्यात आली. शहरातील काही दलित वस्तीतील उलट त्यांनी सामाजिक कार्यात सहकार्याचे कामे केली आहेत. असे मोमीनपूरा वार्डच्या नागरिकांकडून सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर वणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार साहील कैलाश पुरी (वय २०) याला सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. तरीदेखील अनेक गंभीर गुन्हे करणारे व्यक्ती खुलेआम वावरत असताना, अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी संबंधित अधिकारी यांना गुपनीय माहिती दिली परंतु अद्यापही कोणतीच कारवाई केल्या गेली नाही. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीवरच कठोर कारवाई का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
