
वणी शहरातील दि. १६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील समस्त आंबेडकरी अनुयायांच्या वतीने सायं.६:३० वा. सर्व प्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते: सोमनाथ सूर्यवंशी यांना कॅन्डल लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

घडलेली घटना: बीड परभणी येथील दि.१५ डिसेंबर रोजी, आंबेडकरी आंदोलक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतलाय.
लॉचां विद्यार्थी असणारा हा तरुण “न्यायालयीन कोठडीत” असताना मरण पावल्याने आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्तेना ही मोठी शोकांतिका आहे. संसद भवन दिल्ली येथे: महाराष्ट्राच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारासमोर परभणी येथिल प्रकरणा बदल आंदोलने केल्या गेले. देशभर या घटनेचा तीव्र निषेध: व्यक्त केले जात आहेत.

तसेंच चौकातील समाज बांधवानकडून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते: सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे, शहिद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे’ अमर रहे’ असे घोषणा बाजी नारे दिल्या गेली.

आदरांजली वाहण्याचे आयोजन यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीने करण्यात आले.
यावेळी आंबेडकरी अनुयायी व अनेक समाजबांधव मोट्या संखेने उपस्थित होते.
