अमरावती: महाराष्ट्र विधान परिषदेकरीता अमरावती शिक्षक मतदार संघातून 23 ऑक्टोबर 2026 ला निवडणूक होत आहे. देशातील व आपल्या राज्यातील शैक्षणिक, राजकीय,सामाजिक परिस्थिती लक्षात घेता तसेच खालील शिक्षण क्षेत्रातील काही प्रश्न व आवाहने पुढ़ील कालखंडात कांग्रेेस उमेदवार सोडवन्या साठी प्रयत्न करतील या अपेक्षने मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रा. सौ.अदिती पोहरे यांना पाठिंबा देत आहोत. तसेच पक्षाशी संबंधित व संलग्नित सर्व संघटनांना व शिक्षकांना काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करत आहे.
1. विद्यमान भाजप युतीच्या सरकारने चुकीचे शैक्षणिक धोरण राबवून शिक्षण व्यवस्था खिळखिळी करून टाकली आहे. विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकांची भरती नसल्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला आहे तसेच माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील मोठ्या प्रमाणात स्वयंअर्थसहाय्यीत शिक्षण व्यवस्था निर्माण केल्यामुळे शिक्षकांची स्थिती वेठबिगार मजुरांची झाली आहे. देशाच्या निर्माणा मध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या शिक्षण व्यवस्थेकडे सरकारने दुर्लक्ष केले असून सर्व शिक्षण व्यवस्था व्यापारी तत्त्वावर चालवण्याचे धोरण सरकारचे दिसते.
2. देशातील सर्व महत्त्वाच्या संस्थेमधील वैद्यकीय प्रवेश परीक्षा व इतर प्रवेश परीक्षांमध्ये पेपर फुटीचे प्रकरण तसेच महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षा पेपर फुटीचे प्रकरण ताजे आहे. सरकारने हे सर्व प्रकरण व आंदोलने असंवेदनशील पद्धतीने हाताळली. त्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी तरुण विद्यार्थी नेत्यांचा छळ करण्यात आला.
3. विद्यापीठांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला असून आपल्या विचारांच्या लोकांच्या नियुक्तया सरकारद्वारे करण्यात येत आहे व विद्यापीठ हे राजकीय आखाडा बनत आहे.
4. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे. लोकशाही मूल्य, स्वातंत्र्याची प्रेरणा व संविधानाने दिलेली मूलभूत हक्क याकरिता देशांमध्ये जनआंदोलने होत आहे. समाजातील सुजाण घटक म्हणून शिक्षक यापासून अलिप्त व चूप राहू शकत नाही.
5. गेल्या काही निवडणुकांपासून अमरावती शिक्षक मतदार संघ वेगवेगळ्या आमिषांमुळे बदनाम झालेला आहे.
अमरावती विभागातील सुजाण शिक्षक मतदार बंधू आणि भगिनी यांनी या आमिषाला बळी न पडता सदसदविवेक बुद्धीने मतदान करावे असे आवाहन आम्ही मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष करत आहोत.
6. डाव्या पक्षांच्या खासदारांनी संसदेमध्ये 2004 पासून नवीन पेन्शन योजनेला विरोध केला व जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सुद्धा जुनी पेन्शन लागू करण्याची भूमिका घेतली आहे. राजस्थान, छत्तीसगड व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये त्यांची सरकार निवडून आली व तिथे काँग्रेस पक्षाने जुनी पेन्शन योजना लागू केली.
7. महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतला आहे. सर्व शिक्षक मतदार बंधू आणि भगिनी यांनी शिक्षण व्यवस्था वाचविण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ .तुकाराम भस्मे , राज्य कार्यकारणी सदस्य कॉ . अशोक सोनारकर , मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ सुभाष पांडे, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ अनिल गायकवाड बुलढाणा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अमरावती जिल्हा सचिव कॉ . सुनिल मेटकर , मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे अमरावती जिल्हा सचिव कॉ रमेश सोनूले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्हा सचिव कॉ . अनिल घाटे , मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे यवतमाल जिल्हा सचिव कॉ कुमार मोहरमपूरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अकोला जिल्हा सचिव कॉ . नयन गायकवाड , मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे अकोला जिल्हा सचिव कॉ राजन गावंडे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बुलढाणा जिल्हा सचिव कॉ . सि .एन . देशमुख व कॉ . संजय बाजड वाशिम ,आम्ही दोन्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करत आहोत.
