
वणी – शहरातील मोमीनपुरा परिसरात रविवारी सायंकाळी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिकांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य टाळावे आणि सोशल मीडियावर भडकावू पोस्ट प्रसारित करू नयेत, असे सांगण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाळ उंबरकर, पोलीस दल तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


