Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • मोहादा येथे; छत्रपती शिवाजी महाराज जन्मोस्तवाचे आयोजन..
  • वणी

मोहादा येथे; छत्रपती शिवाजी महाराज जन्मोस्तवाचे आयोजन..

NewWaniDiary 14/02/2025

▪️ सामूहिक विवाह सोहळा,सत्कार समारंभ, प्रबोधन आणि मोहदा प्रीमियम लीगचे उद्घाटन..

स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव दिनांक 19 फेब्रुवारी हा सर्व जगभर मोठ्या उत्साहात साजरा होत असतो यानिमित्ताने शिवा महोत्सव समिती मोहदा तथा संभाजी ब्रिगेड मोहदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहदा तालुका वणी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


या दोन दिवसीय कार्यक्रमध्ये दिनांक 19 फेब्रुवारीला सकाळी सहा ते आठ ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच सायंकाळी सहा ते दहा या वेळामध्ये गावात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने दुसरे दिवशी 20 तारखेला. सर्व धर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर व नवनिर्वाचित आमदार संजय दरेकर यांचा जाहीर सत्कार या कार्यक्रमांमध्ये घेण्यात येणार आहे.यवतमाळ येथील प्रसिद्ध विचारवंत लेखक: नंदू बुटे यांचे यावेळी व्याख्यान आयोजित केलेले आहे

त्याचप्रमाणे मोदा प्रीमियम लीग चे उद्घाटन यावेळी ठेवण्यात आलेले आहे.या सर्व उपक्रमासाठी संभाजी ब्रिगेड वणी तालुकाध्यक्ष तथा शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश बोंडे सचिव अमोल शेलवडे, उपाध्यक्ष वैभव मडावी,सदस्य अमोल पुनवटकर, रमण मेश्राम, मण कुचनकर,श्रीकांत देठे, विनीत कुचनकर, स्वप्नील बोथले, रुपेश खुसपुरे, आशिष शेलवडे, विशाल कुचनकर खलील शेंख यासह सर्व ग्रामवाशी परिश्रम घेत आहे.

Continue Reading

Previous: डिजिटल अरेस्टची धमकी मिळाली का?
Next: स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी १० घरफोड्या व १ चोरीच्या गुन्ह्यासह एकूण ११ गुन्हे उघडकीस

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.