Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • “यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट” च्या वतीने महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका कडूबाई खरात यांचा भव्य सत्कार
  • वणी

“यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट” च्या वतीने महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका कडूबाई खरात यांचा भव्य सत्कार

NewWaniDiary 13/02/2025

वणी– नऊ कोटी जनतेच्या हृदयात आपली जागा बसवणारी आम्हा सर्वांची एकमेव माऊली त्याग मूर्ती माता रमाई यांचे योगदान अद्वितीय आहे. आपल्या निस्सीम त्यागातून तमाम महिलांना वात्सल्य, प्रेम, त्याग, करुणा या मूल्यातून नवीन आदर्श निर्माण केला. तो वसा समाजातील सर्व भगिनींनी आत्मसात करावा या उदात्त हेतूने रमाई जयंती निमित्त शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी शासकीय मैदान, वणी येथे महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका भिमकन्या आयु. कडूबाई खरात यांचा बुद्ध व भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


यावेळी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट, वणी द्वारे महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका भीमकन्या कडूबाई खरात यांना माता रमाई यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट चे हेमंतकुमार टिपले, रज्जत सातपुते, प्रेम अडकीने, आकाश बोरकर, पुखराज खैरे, आदित्य वाळके, गौरव जवादे, इस्माईल खान, तन्मय लामसोंगे, अंकित पाझारे, कुंदन चांदुरकर, हर्षल चाफडे, ऋषभ चुनारकर, योगेश दुर्गे, ईश्वर देठे, अष्टांग खोब्रागडे, काजल अशोक वाळके, अंकिता देवानंद पथाडे, ऋचा दारुंडे, साक्षी मेश्राम, श्रीशा मरकवाडे उपस्थित होते.

Continue Reading

Previous: आशा व गटप्रवर्तक संघटना सिटूच्या जिल्हा अध्यक्षपदी ॲड. कुमार मोहरमपुरी तर जिल्हा सचिवपदी उषा मुरखे यांची निवड
Next: सुजाता थिएटर में 14 फरवरी से हिन्दी फिल्म ‘छावा’ के रोजाना 4 शो

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.