
वणी :- लहान स्केटिंगपटू मनस्वी विशाल पिंपरे वय.७ हिचा वणी येथे सत्कार करण्यात आला. मनस्वीने बोटोणी ते वणी या ३० किमी अंतरावर स्केटिंग करत आले होते. आतापर्यंत स्केटिंगमध्ये १०४ सुवर्णपदकं जिंकलेल्या मनस्वीने तरुण पिढीला प्रेरणा देण्याचा उद्देश ठेवून हा प्रवास केला.



तिच्या पराक्रमासाठी वणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजकीय नेते व इतर संघटनेकडून तिचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणीतील नागरिक उपस्थित होते.
