Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • मुंबई
  • क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर..
  • मुंबई

क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर..

NewWaniDiary 25/03/2025

▪️ राजमान्यतेसाठीचा ऐतिहासिक ठराव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करावा, या शिफारशीचा ठराव आज महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केला. हा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.

या ठरावाबाबत विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ कुठल्याही देशात दोन प्रकारच्या मान्यता असतात – एक राजमान्यता आणि दुसरी लोकमान्यता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे लोकमान्यतेचे प्रतीक आहेत. त्यांची लोकमान्यता कधीच हिरावून घेता येणार नाही. मात्र, त्याच वेळी भारतरत्न हा राजमान्यता मिळवून देणारा सर्वोच्च सन्मान आहे आणि या महान विभूतींना तो सन्मान मिळायला हवा.”

या ठरावामुळे सामाजिक सुधारणांचा पाया रचणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सर्वोच्च मान्यता मिळणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीशील आणि समतावादी भूमिकेला अधोरेखित करणारा आहे. ‘भारतरत्न’ पुरस्काराच्या माध्यमातून या विभूतींचे कार्य राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होणार असून, संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री यांच्या अधिकृत WhatsApp चॅनेलवरून माहिती मिळाली आहे.

Continue Reading

Previous: मारेगाव येथे;जागतिक महिला दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महिलांसाठी विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा..
Next: माणूस पैशानं नाही, कर्मानं मोठा होतो?

Related Stories

SAVE_20251216_200159
  • मुंबई
  • वणी

माजी आमदार विश्वास नांदेकर यांची लीलावती रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

NewWaniDiary 17/12/2025
SAVE_20250319_103638
  • मुंबई

शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला आवाहन

NewWaniDiary 19/03/2025
SAVE_20250117_205615_11zon
  • महाराष्ट्र
  • मुंबई

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सज्ज होतोय महाराष्ट्र!

NewWaniDiary 17/01/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.