Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीतील प्रभाग ५ मध्ये सायकल चोर मोकाट
  • वणी

वणीतील प्रभाग ५ मध्ये सायकल चोर मोकाट

NewWaniDiary 05/02/2026

▪️पोलीस तक्रारींचा अभाव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या वणी ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेरील परिसरात सायकल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास, एका चौकीदाराने आपली सायकल शेतकरी मंदिराच्या गेटसमोर उभी करून शौचालयासाठी गेले होते. काही वेळाने परत आल्यानंतर त्या ठिकाणी सायकल आढळून आली नाही. परिसरात शोध घेऊनही सायकल न सापडल्याने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

विशेष म्हणजे, ही चोरी कब्रस्थानाच्या मुख्य गेटसमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या परिसरातच झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही असूनही चोरीच्या घटना रोखल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

याच परिसरात दोन दिवसांपूर्वी, वणी ग्रामीण रुग्णालयाबाहेरील एका हेअर कटिंग दुकानदाराची तसेच रुग्णालयासमोरील चहा दुकानदाराची सायकल दुकानातून चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनांची पोलीस ठाण्यात अद्याप रीतसर नोंद करण्यात आलेली नाही, त्यामुळे चोर मोकाट फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, सायकल चोरी करणारे चोरटे या सायकली भंगार दुकानात अवघ्या २०० ते ३०० रुपयांत विकून मोकळे होत आहेत. याआधी काही नागरिकांनी रीतसर तक्रारी दाखल करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

सतत घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. चोरी झाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात येत असले तरी प्रशासन व पोलिसांनीही ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

जर वेळीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर भविष्यात अशा चोरीच्या घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Continue Reading

Previous: गणराज्य दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाविरोधात कठोर कारवाईची मागणी
Next: देशव्यापी संप ला पाठिंबा दर्शवित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.