Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • निलजईत अनुसूचित जातीच्या महिलेवर जातीवाचक शिवीगाळ व धमक्या
  • वणी

निलजईत अनुसूचित जातीच्या महिलेवर जातीवाचक शिवीगाळ व धमक्या

NewWaniDiary 06/10/2025

वणी – निलजई (ता. वणी): निलजई येथे भाड्याने वास्तव्य करणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिलेवर गावातील व्यक्तीने जातीवाचक शिवीगाळ करून जीव घेण्याच्या धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

सौ. साधना प्रशांत नगराळे (वय ३७, बैद्ध समाज) यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, मनोज ऊर्फ मंजु भाऊराव डंभारे (वय ४८, रा. निलजई) याने दि. ३० ऑगस्ट रोजी त्यांच्या घरासमोर येऊन जातीवाचक शिवीगाळ केली व जीव घेण्याच्या धमक्या दिल्या.

तसेच दि. २६ सप्टेंबर रोजी जीआरएन कंपनीत रोजगारासाठी गेल्या असता, आरोपीने कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर “हिला कामावर घेतल्यास कंपनी बंद पाडीन” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे फिर्यादीचा रोजगार धोक्यात आला असून जीवितासही धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

दि.१ ऑक्टोबर रोजी फिर्यादीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, गुन्हा दाखल झाल्यानंतर ती भीतीमुळे निलजई गाव सोडून सध्या माहेरी, मार्डी (ता. वणी) येथे राहत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात आरोपी हा भाजप कार्यकर्ता व अवैध रेती व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.

नोंदविण्यात आलेले गुन्हे :

  1. भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 कलम 351(2)
  2. अजा-जजा अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1989 – कलम 3(1)(r)
  3. अजा-जजा अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1989 – कलम 3(1)(s)

सदर गुन्हा शिरपूर पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आला असून पुडील तपास पोलीस करीत आहे.

Continue Reading

Previous: वणीतील लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हृदयविकाराने निधन
Next: वणीतील ३३ वर्षीय युवक बेपत्ता

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.