Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी तहसील परिसरातील सेतु सुविधा बंद असल्याने नागरिक त्रस्त..
  • वणी

वणी तहसील परिसरातील सेतु सुविधा बंद असल्याने नागरिक त्रस्त..

NewWaniDiary 20/02/2025

▪️ मादगी, मोची, मादरू, मादिगा महासंघाची तात्काळ सेवा पुर्वरत करण्याची मागणी…

वणी:- गेल्या काही महिन्यांपासून तहसील परिसरातील सेतू बंद स्थितीत असून सदर सेतु बंद असल्याने त्याची सेवा पूर्वरत करावी अशा मागणीचे निवेदन मोची, मादगी, मादरू, मादीगा महासंघाकडून उपविभागीय अधिकारी वणी यांना दि. १७ ला निवेदनातून केली आहे.
वणी तहसिल कार्यालय परिसर मधील सेतु सुविधा केंन्द्र गेल्या दोन महिण्यांपासुन बंद असुन अनेक नागरीक या सेतु सुविधा केंद्रातुन सेवा घेत होते. सदर सेतु ची सुविधा ही चांगली व प्रामाणिक होती. यामध्ये अनेक प्रकारचे कागदपत्र त्यांना या सेतु सुविधा केंद्रातुन मिळत होते. परंतु गेल्या दोन महिण्यापासुन सदर सेतु सुविधा केंद्र बंद असल्यामुळे ग्रामिण व शहरी भागातील नागरीकांना तहसिल कार्यालयातील शासकीय कागदपत्रे काढण्याकरीता मोठा नाहक त्रास सहन करावा लागत असुन काही नागरीकांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

तरी नागरीकांची समस्या लक्षात घेवुन तहसिल कार्यालय परिसरातील सेतु सुविधा केंद्र तात्काळ सुरू करून नागरीकांना न्याय दयावा अशा मागणीचे निवेदन मोची, मादगी, मादरू, मादीगा महासंघाकडून उपविभागीय अधिकारी वणी यांना दि. १७ ला देण्यात आले यावेळी नत्थुजी नगराळे, सुरज चाटे, किशोर मंनथंवार, सदाशिव मंगळपवार, विजय आडराने, रीतिक मामिळवार, विशाल मामिडवार, प्रमोद मंथंनवार, प्रेम कोमलवार, रवी कोमलवार, सचिन चाटे आदी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: कांग्रेस पक्षाने: संजय खाडे व त्यांच्या 7 सहकाऱ्यांचे निलंबन रद्द केले..
Next: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मारेगाव येथे:आमरण उपोषण सुरू..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.