Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी नगरपरिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची चर्चा; प्रामाणिक उमेदवारांची नागरिकांकडून मागणी
  • वणी

वणी नगरपरिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची चर्चा; प्रामाणिक उमेदवारांची नागरिकांकडून मागणी

NewWaniDiary 28/10/2025

वणी (प्रतिनिधी): आगामी वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नव्या चेहऱ्यांची चर्चा रंगू लागली आहे. अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असून सोशल मीडियावर यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे.

मात्र शहरातील मतदारवर्गात अशी मागणी जोर धरत आहे की, उमेदवारांची निवड करताना त्यांच्या सामाजिक कार्यातील सहभाग, चारित्र्य आणि वार्डातील विकासासाठी केलेल्या प्रत्यक्ष कामांचा गंभीरपणे विचार करण्यात यावा.

दरम्यान, शहरातील काही व्यक्ती ज्यांचा संबंध वरली मटक्याठिकाणी काम, इतर अवैध धंदेत डागीले-डुगिले प्रकार तसेच समाजाच्या भावना दुखावणाऱ्या घटनांशी संबंधित काही व्यक्ती आता नगरसेवक होण्याची इच्छा व्यक्त करत असल्याने नागरिकांमध्ये आणि समाजात नाराजीचे वातावरण आहे.

मागील निवडणुकीत भाजपाने बहुसंख्य नगरसेवक निवडून आणत सत्ता कायम राखली होती. मात्र काही लोकप्रतिनिधींच्या गैरवर्तनामुळे आणि विशेषतः दलित वस्त्यांतील विकासकामे रखडल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. त्यामुळे काही जुन्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास भाजपाला फटका बसू शकतो, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

आता सर्वांचे लक्ष या दिशेने लागले आहे की, सर्व पक्ष मतदारवर्गाच्या अपेक्षेनुसार प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमेचे आणि विकासाभिमुख उमेदवार पुढे आणतील का?

Continue Reading

Previous: घटस्फोट एक गुन्हा की यल्गार?
Next: वणी नगर परिषद निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडचे; अजय धोबे यांची जय्यत तयारी..

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.