Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीतील शेतकरी, बेरोजगार, वीज ग्राहक आणि महिलांच्या प्रश्नांवर 23 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे धरणे आंदोलन
  • वणी

वणीतील शेतकरी, बेरोजगार, वीज ग्राहक आणि महिलांच्या प्रश्नांवर 23 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे धरणे आंदोलन

NewWaniDiary 22/07/2025


वणी (प्रतिनिधी) – शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, वीज ग्राहक, महिला अत्याचार आणि वणी व परिसरातील नागरी समस्यांबाबत काँग्रेस तर्फे भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन बुधवार, 23 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता वणी तहसील कार्यालयासमोर होणार असून, वणी, मारेगाव आणि झरी तालुका काँग्रेस यामध्ये सहभागी होणार आहे.

या आंदोलनाचे समन्वयक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे असून त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. त्यांनी वणी उपविभागातील सर्वसामान्य नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य मागण्या:

  • वीज बिल माफ करणे आणि सातत्याने वीज पुरवठा करावा
  • शेतकऱ्यांची कर्जमाफी व पिकांना हमीभाव द्यावा
  • महिलांवरील अत्याचारावर कठोर शासन
  • वणी व परिसरातील पाणीपुरवठा व नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात
  • बेरोजगारांच्या प्रश्नांचे निराकरण करावे

वणी उपविभागात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसोबतच वीज व पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरात 8-8 दिवस पाणीपुरवठा होत नाही, घाणीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक निवेदने दिल्यानंतरही प्रशासनाने या समस्या सोडविण्यात अपयश आले आहे.

म्हणूनच नागरिकांच्या हक्कासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: वणी शहरात पोलिसांची पेट्रोलिंग मोहीम; नागरिकांकडून सातत्याची मागणी..
Next: वणी शहरातील दलित वस्तीतील सार्वजनिक शौचालय दयनीय अवस्थेत; आरोग्याचा गंभीर प्रश्न

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.