Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी नगरपालिकेच्या नव्या मालमत्ता कराविरोधात काँग्रेसचे निवेदन
  • वणी

वणी नगरपालिकेच्या नव्या मालमत्ता कराविरोधात काँग्रेसचे निवेदन

NewWaniDiary 22/09/2025

वणी (प्रतिनिधी) : वणी नगरपालिकेने नुकतीच मालमत्ता कराची नवीन आकारणी केली असून हा कर मागील कराच्या दुप्पट-चौपट आहे. या करवाढीविरोधात आज दि. २२ सप्टेंबर रोजी वणी विधानसभा क्षेत्र काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे मार्फत मुख्याधिकारी, नगर परिषद वणी यांना निवेदन देण्यात आले.

नवीन कर आकारणीबाबत कोणताही ठराव घेण्यात आलेला नाही. तसेच पुढील चार वर्षांसाठी ही करवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वणीकरांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे काँग्रेस कमिटीने निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, वणी शहरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाणीपुरवठा अनियमित आहे. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात रस्त्यांवर डबकी साचतात. शहरातील अनेक भागात झाडे-झुडपे वाढली असून पालिकेचे त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. अशा परिस्थितीत कोणतीही मूलभूत सुविधा न देता करवाढ लादणे जुलमी व अन्यायकारक आहे.

ही करवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा काँग्रेसतर्फे पालिकेसमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे, अशोक चिकाटे, प्रफुल उपरे, रामदास कुचनकार, संदीप कांबळे, रवी कोटावार, राजू डवरे, राजा पाथडकर, प्रेमनाथ मंगाम, कैलास पचारे, सुधीर खंडाळकर, कैसर पटेल, ओम ठाकूर, विकेश पानघाटे, अशोक पांडे, राजू मंथनवार, गणेश बोंडे, तोहीद अहमद यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: वणीकरांवर करवाढीचा अन्याय – काँग्रेसकडून सोमवारी नगरपालिकेला निवेदन
Next: वणी पब्लीक स्कुल येथे शिक्षक दिन संपन्न

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.