
वणी (प्रतिनिधी) : वणी शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी चौकाचौकात गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या नेतृत्वाखाली वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली.
शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच काही दुचाकीस्वार व ऑटोचालक सुसाट वेगाने वाहन चालवत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख परशुराम पोटे, यवतमाळ जिल्हा महिला संपर्कप्रमुख सौ. सुमित्राताई नारायण गोडे, जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मनिषा सुरेंद्र निब्रड, वणी शहराध्यक्ष अजय चन्ने, शहर महिला अध्यक्ष सौ. प्रेमीला मनोज चौधरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बन्सोड, संजय चिंचोळकर, संदिप बेसरकर, राकेश दिकुंडवार आदी मान्यवर उपस्थित होते.
