Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • निधन वार्ता
  • तरोडा येथील मधुकर जेऊरकर यांचे हृदयविकाराने निधन
  • निधन वार्ता

तरोडा येथील मधुकर जेऊरकर यांचे हृदयविकाराने निधन

NewWaniDiary 27/05/2026

वणी तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यात सक्रिय असलेले मधुकर नथ्थुजी जेऊरकर (वय ५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ मे रोजी ते वेकोली निलजई खुल्या खदानीमध्ये रात्रपाळीच्या कर्तव्यावर होते. दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने दुसऱ्या दिवशी त्यांनी सोनबा देव मंदिर परिसरात आरामासाठी थांबले होते. मात्र शारीरिक त्रासाची तीव्रता वाढल्याने त्यांनी घरी निरोप दिला. त्यानंतर त्यांचा मुलगा आकाश उर्फ मारोती जेऊरकर यांनी त्यांना घरी आणले.

घरी विश्रांती घेत असताना पुन्हा छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. उपचारापूर्वीच दि. २६ मे रोजी सकाळी सुमारे ५:४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुली, मुलगा, बहीण असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर तसेच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

स्व. मधुकर जेऊरकर हे जनकल्याणकारी स्वभावामुळे परिसरात सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्यावर दि. २७ मे रोजी दुपारी १२ वाजता, मुलगी राजस्थान येथून आल्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

Continue Reading

Previous: केंब्रिज विद्यापीठातून एमबीए पूर्ण; श्वेता जेनेकरचे जागतिक यश
Next: वणीतील दामले फैलमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांना टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ

Related Stories

SAVE_20251001_130535
  • निधन वार्ता

वणीतील लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हृदयविकाराने निधन

NewWaniDiary 01/10/2025
SAVE_20250823_204220
  • निधन वार्ता

वणीतील सुभद्राबाई रघुवीर यांचे निधन

NewWaniDiary 23/08/2025
SAVE_20250328_084257
  • निधन वार्ता

शंकर का ढाबा संचालक; शंकर उईके यांचे निधन..

NewWaniDiary 28/03/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.