Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • “विकासाचा अभाव” नागरिकांची नाराजी
  • वणी
  • राजकीय

“विकासाचा अभाव” नागरिकांची नाराजी

NewWaniDiary 23/10/2025

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील दलित वस्ती अंतर्गत येणाऱ्या दामले नगर परिसराच्या वार्डातील सार्वजनिक शौचालये दीर्घकाळापासून दुरुस्तीसाठी बंद असून, विहाराजवळील पाण्याचे बोअरही बंद पडले आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असून, काहींना तर चिकलगाव ग्रामीण भागात जाऊन लिकेज पाईपलाइनमधून पाणी भरावे लागत आहे.

मात्र, नागरिकांचे म्हणणे आहे की “लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित विकास कामे झाली नाहीत.” त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत स्थानिक नागरिक “आपल्या वार्डातील जबाबदार व्यक्तीला संधी द्यावी” अशा विचारात आहेत.

वार्डातील समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही काहीही सकारात्मक हालचाल झालेली नाही. अनेक जबाबदार नागरिकांनी पालिकेकडे निवेदने दिली, पाठपुरावा केला, पण तरीही समस्या कायम आहेत.

परिसरात सध्या हीच चर्चा रंगली आहे की, “आपल्या वार्डात अनेक वर्षांपासून विकास झाला नाही; आता नागरिकांनी बदलाचा निर्णय घ्यावा.”

Continue Reading

Previous: वणी नगरपरिषद निवडणुकीत कु. सिमा कुमरे नगराध्यक्षपदाच्या चर्चेत
Next: कामगार कल्याण मंडळाच्या योजनेचा गैरवापर — श्रीमंत लोक घेत आहेत गरीब मजुरांच्या योजनांचा लाभ!

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.