Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • न. प. शाळा क्र. १ वणी येथे: “राजमाता जिजाऊ” यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..            
  • वणी
  • शैक्षणिक

न. प. शाळा क्र. १ वणी येथे: “राजमाता जिजाऊ” यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..            

NewWaniDiary 16/01/2025

१५ फेब्रुवारी रोजी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटच्या वतीने महात्मा गांधी न. प. शाळा क्र. १, वणी येथे “राजमाता जिजाऊ” यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक शंकर अत्राम  प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका रेखा धानोरकर, शिक्षिका मीना थोरात, शिक्षक एकनाथ लांबट,शिक्षक जायभाये,अंगणवाडी सेविका प्रतिभा मानकर,न.प.शाळा क्र २ चे मुख्याध्यापक अविनाश पालवे  तसेच यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट या संघटनेचे मार्गदर्शक हेमंतकुमार टिपले उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे  मुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश देत त्यांच्या समाजकार्याची जाणीव करून दिली. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मीना थोरात यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करून यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच  संघटनेचे मार्गदर्शक हेमंतकुमार  टिपले यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि  फातिमा बेग यांचे शिक्षणाशी निगडित योगदान या बद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अविनाश पालवे शिक्षणाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रतिभाताई मानकर  यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर भर टाकला. शिक्षणाचे महत्व किती आणि काय आहे याचे उदहारण देतं आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रज्जत सातपुते यांनी केले व आभार गौरव जवादे यांनी केले. अंकिता पथाडे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमध्ये संघटनेच्या ध्येय, उद्देशाबद्दल तसेच इतर कार्याबद्दल माहित दिली.

यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आयोजित “एक वही – एक पेन” या उपक्रमात आलेल्या वह्या – शैक्षणिक साहित्याचे वाटप शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतर्फे शिक्षिका रेखा धानोरकर यांनी लिखित स्वरूपात फीडबॅक दिला. तसेच मुख्याध्यापक शंकर आत्राम  यांनी उपक्रमाचे कौतुक करून संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता दिसून येते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करणे हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला.मुख्याध्यापकांनी लेखी स्वरुपात संघटनेला पत्र देऊन संघटनेच्या या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या!

यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक वर्ग तसेच यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटचे सर्व सदस्य प्रेम अडकीने,आकाश बोरकर, सुरज खैरे,काजल वाळके, श्वेता माहुरे, ऋचा दारुंडे, राहुल घोस्की, इस्माईल खान, अश्विनी अडकीने इत्यादी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: सत्यम क्लॉथ सेंटर येथे: साड्यांची स्पेशल ऑफर सुरु..
Next: वणी विधानसभेचे आमदार: संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.