Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • नगर पालिकेच्या शौचालयतील व रस्तावर कचर्याचे घाण असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली..
  • वणी

नगर पालिकेच्या शौचालयतील व रस्तावर कचर्याचे घाण असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली..

NewWaniDiary 20/01/2025

वणी शहरातील: दामले नगर वार्डातील नगर पालिकेने स्वच्छतेची तातडीने दखल घेण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. नगर पालिकेच्या शौचालय परिसरातील गटारे व मोठ्या प्रमाणात रस्तावर कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली असून, यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिव मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर साचलेल्या कचर्यामुळे मंदिराकडे जाणे कठीण झाले आहे.

याशिवाय, या परिस्थितीमुळे परिसरात डास आणि मच्छर वाढले आहेत, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या घातक आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांनी वणी नगर परिषदेकडे परिसराची स्वच्छता करण्याची, साचलेल्या गटारांची साफसफाई करण्याची व औषधी फवारणी करण्याची मागणी केली आहे. या समस्येचे तातडीने निवारण न झाल्यास आरोग्याच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Continue Reading

Previous: आर्णी में: शाही संदल, महफिले कव्वाली और भव्य खंजेरी भजन प्रतियोगिता और सामाजिक जागरूकता विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया।
Next: वणीच्या गोहत्या प्रकरणातील: महाराष्ट्र राज्याच्या गोहसेवा आयोग दाखल..

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.