
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या कर्जत, जि. रायगड येथे झालेल्या राज्यव्यापी संघटनात्मक परिषदेत कॉ. अनिल घाटे यांची राज्य उपाध्यक्षपदी, तर कॉ. अनिल हेपट आणि कॉ. गुलाबराव उमरतकर यांची राज्य कौंसिलर म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यात सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील किसान आंदोलनाला बळकटी मिळाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी लवकरच वणी येथे राज्यव्यापी कापूस-सोयाबीन परिषद आयोजित करण्याची घोषणा केली आहे.
