
वणी (प्रतिनिधी): Pulwama attack मध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) च्या वीर जवानांना वणी शहरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला.

यावेळी अमर जवानांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. “वीर जवान अमर रहे”, “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहीद जवानांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमास युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अनेक नागरिक उपस्थित होते. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या शौर्याची आठवण कायम ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
उपस्थित: राजु तुराणकर, नगरसेवक अजय धोबे, मनीष बतरा , नगरसेवक अनिकेत बदखल, मिलिंद बावणे, विनोद दुमणे, ऋषी काकडे, कैलास पचारे, तेजस नागतुरे, संजोग झाडे, निलेश चिंचोलकर, सुयश नगराळे, सोनू नरड, प्रफुल बोर्डे, आशिष रिंगोले, श्रीकांत उके, रौनक बिलोरिया, आदित्य बिलोरिया आदी उपस्थित होते.
