Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या वाघाच्या प्रकरणात चौघा आरोपींना अटक
  • वणी

कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या वाघाच्या प्रकरणात चौघा आरोपींना अटक

NewWaniDiary 17/01/2025

वणी वन परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात एका कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या वाघाच्या प्रकरणात चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्यांना दि. १७जानेवारी रोजी, वणी न्यायालयात हजर केले गेले आहे.

•उकणी येथील प्रकरण..
एका पट्टेदार वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. नखांसह दात होते बेपत्ता होते. ही खळबळजनक घटना मंगळवारी दि.७ जानेवारी रोज, सकाळी वेकोलीच्या उकणी कोळसा खाणीत उघडकीस आली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पशुवैद्यकीय पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. तेव्हा वाघाची नखे आणि दात बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या वाघाचा नैसर्गिक मृत्यू नव्हे, तर ‘त्या’ वाघाची शिकारच करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केले गेले होते.
वेकोलीच्या उकनी कोळसा खाणीतील माता मंदीर परिसरापुढे पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आले होते.

वन विभागाने तपासादरम्यान या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे गोळा करून आरोपींना जाळ्यात अडकवले आहे. वाघाच्या मृत्यूमागील कारणांचा तपास सुरू असून, त्यामध्ये शिकारीचा संशय व्यक्त केला जात आहे. वन विभाग आरोपींवर कठोर कारवाईसाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवित आहे.

Continue Reading

Previous: वणी विधानसभेचे आमदार: संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Next: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सज्ज होतोय महाराष्ट्र!

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.