▪️ या मागणीला घेऊन कंपनीसमोर 25 एप्रील पासुन भाकपचे नेत्रुत्वात बेमुदत धरणे आंदोलन ..

वणी : निलजई बेलोरा परिसरात जि.आर.एन.कंपनी सुरु असुन या कंपनीत परीसरातील तरुण बेरोजगारांना व स्थानिक लोकांना नौकरीत सामावून घेण्याबाबत दि.28 मार्च 2025 रोजी निवेदन देऊन कळविले व तशी चर्चा संबधीत अधिकरयासोबत केली होती. परंतु कंपनीने अजूनपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही.कंपनी राजकीय दबावाखाली किंवा ओळखी -पाळखीच्या युवकांना रोजगार देतात व ज्या युवकांना रोजगाराची गरज असतांना त्याची ओळख किंवा राजकीय जवळीक नसेल तर त्याला नौकरीत समावून घेत नाही.
अशा युकावर उपासमारीची वेळ येत आहे.डब्लू. सि. एल.ने परिसरातील शेतींचे अधिग्रहण केल्यामुळे व शेतमजुरी हा व्यवसाय गेल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला कामेसुद्धा राहीली नाही,दुसरा व्यवसाय नाही. त्यामुळे स्थानिक गरजू युवकांना रोजगार देणे ही कंपनीची सामाजिक व कायदेशीर जबाबदारी आहे. याची जाणीव भाकपने कंपनीस अनेक वेळा करून दिली.
परंतु कपनीने कोणतेही म्हणणे ऐकूण घेण्यास तयार नाही. म्हूणन परिसरातील सर्व बेरोजगार युवक भारतीय काम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात दि. 25 एप्रिल रोजी ला सकाळी 11 वाजेपासून कंपनीच्या कार्यालयासमोर “बेमुदत धरणे आंदोलन करीत असल्याचे निवेदन सर्व बेरोजगार युवक व शेतमजुरातर्फे भाकपचे काॅ.मोरेश्वर कुंटलवार, काॅ.रवींद्रभाऊ गोरे,काॅ.दीपक,काॅ.पंढरीभाऊ मोहितकर,काॅ.दिनेशभाऊ शीटलवार,काॅ.मिलिंद रामटेके,राज्य कौंसिलर काॅ.सुनिल यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ,उपविभागीय अधिकारी वणी,पोलिस स्टेशन शिरपुर व संबधित कंपनी व्यवस्थापनास दिले.किसान सभेचे राज्य कौंसिलर व वणी विधानसभा मतदारसंघाचे नेत्रुत्व काॅ.अनिल हेपट,भाकपचे जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे यांचे उपस्थितीत सुरु होणारया आंदोलनात परिसरातील बेरोजगार युवकांनी बहुसंख्येने उपस्थीत रहाव असे आवाहन संभाशिवभाऊ ताजने, वसंतभाऊ कोट्टे,गणेशभाऊ कळसकर,सुनील मडावी,संजय इंगोले,अनिल मडावी,हनुमान भोयर,ज्ञानेश्वर चौधरी,महेश इंगोले,प्रकाश पारशिवे,प्रभाकर डंभारे,आनंद कोयचाडे,बंडू मडावी यांचेसह आदींनी केले.

