
वणी : शहरातील शांतीदूत मर्दानी आखाडा, वणी यांच्या वतीने मुला-मुलींसाठी शिवकालीन मर्दानी खेळांचे भव्य उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्दिष्ट: मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून मुलांनी शिवबांचे मावळे होण्यासाठी मर्दानी खेळ शिकावेत. आणि वयोमर्यादा: ७ वर्षाच्या वर राहील. २२ एप्रिल ते २९ एप्रिल रोजी पर्यंत प्रशिक्षण सुरु राहणार आहेत.
सायंकाळी ५ ते ७ गव्हर्नमेंट हायस्कूल, वणी (पाण्याच्या टाकीजवळ)
मुख्य उपक्रम: – जिजाऊंची शाळा,शिवबांचे संस्कार वर्ग, लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, फरी-गदगा यांसारख्या मर्दानी खेळांचे प्रशिक्षण आणि शिवकालीन शस्त्रांची माहितीपूर्ण देण्यात येईल. प्रशिक्षक:वस्ताद सुरज केसरकर, वस्ताद अतुल शिंदे व त्यांचे सहकारी उपस्थित राहणार आहे.
नोंदणीसाठी संपर्क:
– नरेश मुरस्कर सर: 9096488200
– शारदा मॅम: 9822567674

