Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे जन सुरक्षा विधेयकाची होळी..
  • वणी

वणी येथे जन सुरक्षा विधेयकाची होळी..

NewWaniDiary 20/07/2025

▪️ जन सुरक्षा विधेयकाचा विरोध व प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा वणी येथे; पुरोगामी संघटना व पक्षांचे निदर्शने आंदोलन संपन्न..

वणी : संघटना बांधण्याचा व आंदोलन करण्याचा अधिकारावर गंडांतर आणणाऱ्या जन सुरक्षा विधेयकाचे विरोधात वनी येथे लोकशाहीवादी संघटनांनी व पक्षाने जन सुरक्षा कायद्याची होळी करून जन सुरक्षा विधेयकाचा विरोधात निदर्शने करून उपविभागीय अधिकारी व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
काल दिनांक 15 जुलै रोजी वनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यासमोर लोकशाहीवादी संघटना व पक्षांनी एकत्र येत जनतेचा अधिकारावर गदा आणणाऱ्या जन सुरक्षा विधेयकाचा विरोधात तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधात निदर्शने करण्यात येऊन जन सुरक्षा विधेयकाची होळी करण्यात आली.
यावेळेस संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अजय धोबे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अनिल हेपट, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, पत्रकार बाळासाहेब खैरे यांनी यावेळेस आपले मत मांडले. या निषेध आंदोलनाचे संचालन दत्ता डोहे यांनी केले.
या निदर्शने आणि निषेध कार्यक्रमाला प्रामुख्याने किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, वणी वकील संघाचे सचिव ॲड. अमोल टोंगे, प्रवीण खानझोडे, गुरुदेव संघटनेचे दिलीप भोयर, भाकप चे जिल्हा सचिव कॉ.  अनिल घाटे, वसंत थेटे, सुरेंद्र घागे,  विनोद बोबडे, विलास शेरकी, भाऊसाहेब आसुटकार, शंकर पुणवटकर, संजय तेलंग, दिलीप वागदरकर, नितीन मोवाडे, कृष्णदेव विधाते, पंढरी मोहितकर, पांडुरंग किन्हेकर, जानू अजानी, अजय कवरासे, राहुल खारकर, मारुती मोडक , मंगेश खामणकर, विनोद बोबडे, विलास शेरकी, संजय गोडे, आशिष रिंगोले आदी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: सुजाता थिएटर वणी मे ता.18 जुलै से 🎬 ‘सैयारा’ रोजाना 4 शो मे..
Next: वणी शहरात पोलिसांची पेट्रोलिंग मोहीम; नागरिकांकडून सातत्याची मागणी..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.