Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • बुद्ध पौर्णिमानिमित्त चंडकापुर येथे ‘तथागत गौतम बुद्ध’ मूर्तीची प्रतिष्ठापना..
  • वणी

बुद्ध पौर्णिमानिमित्त चंडकापुर येथे ‘तथागत गौतम बुद्ध’ मूर्तीची प्रतिष्ठापना..

NewWaniDiary 13/05/2025

वणी : वैशाख बुध्दपौर्णिमा जयंतीनिमित्त वणी तालुक्यातील चंडकापुर गावात दि. १२ एप्रिल २०२५ रोजी दु.१ वाजता “तथागत गौतम बुद्ध” यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ही प्रतिष्ठापना भंते बुद्धदिप व श्रामणेर संघ यांच्या हस्ते, तसेच भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.


या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला गावातील बौद्ध उपासक-उपासिका, समता सैनिक दल, शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, आशा सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततामय आणि धम्ममय वातावरणात पार पडला.
गावाच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विकासात अशा उपक्रमांचा मोलाचा वाटा असून, ग्रामस्थांनी याचे स्वागत करत संयोजकांचे आभार मानले.

Continue Reading

Previous: वैशाख बुध्द पौर्णिमा निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..
Next: घुग्घुसमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त आईस्क्रीम वाटप..

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.