
चंद्रपूर : रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) लोहारा येथील हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे चालू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकून एका पिडीत महिलेची सुटका केली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
31 ऑक्टोबर रोजी LCB चे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की लकी नावाचा युवक हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे पिडीत महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय चालवत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान आरोपी
लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (वय 26 वर्षे), रा. अलवर, राजस्थान
हा पिडीत महिलेकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अनैतिक व्यवसाय करवून घेत असल्याचे उघड झाले.
घटनेवरून रामनगर पोलिस स्टेशनमध्ये कलम 3, 4, 5, 7 – अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
कारवाईत पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सुनील गौरकर, सहायक फौजदार धनराज कारकाडे, पोलिस हवालदार सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, प्रफुल गारघटे, सुमित बरडे, शशांक बादमवार, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चालक मिलिंद टेकाम, तसेच महिला पोलिस छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, निराशा तितरे यांनी सहभाग घेतला.
तसेच सामाजिक संघटनांतून सरिता मालू व रेखा भारसकडे यांनी मदत केली.
