Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त वणीत भव्य मॅराथॉन स्पर्धा; उत्स्फूर्त प्रतिसाद
  • वणी

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त वणीत भव्य मॅराथॉन स्पर्धा; उत्स्फूर्त प्रतिसाद

NewWaniDiary 23/01/2026

वणी | प्रतिनिधी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक वणी येथे भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून भगवा ध्वज फडकावण्यात आला. ही स्पर्धा उत्साहात व मोठ्या जनसहभागासह यशस्वीरीत्या पार पडली.

या मॅराथॉन स्पर्धेत युवक, महिला, बालक तसेच क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली. ओपन गट (मुले) मध्ये विरोचन गोडे यांनी प्रथम, सौरभ दरणे यांनी द्वितीय, शिवम जंगठे यांनी तृतीय तर पियूष पडलमवार यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. ओपन गट (मुली) मध्ये गौरी पांगुळ प्रथम, प्रशांती वसाके द्वितीय, अचल झिले तृतीय तर समीक्षा हनमंते चतुर्थ ठरल्या.

१६ वर्षांखालील गट (मुले) मध्ये शिवम ओझा प्रथम, शिवम कुइटे द्वितीय, सुमित ढेंगळे तृतीय तर अयान सिद्दिकी चतुर्थ ठरले. १६ वर्षांखालील गट (मुली) मध्ये नव्या पिदुरकर प्रथम, पल्लवी ठाकरे द्वितीय, जानवी ठाकरे तृतीय तर श्रद्धा देशमुख चतुर्थ आल्या.

विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व आकर्षक मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. हा उपक्रम आमदार संजय देरकर व किरण संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक यांचा शाल व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे नेतृत्व व आयोजन युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सु. शेंडे यांच्या वतीने करण्यात आले. या मॅराथॉन स्पर्धेमुळे युवकांमध्ये आरोग्य, क्रीडासंस्कृती व सामाजिक एकतेचा संदेश पोहोचल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.

Continue Reading

Previous: ॲड. ट्विंकल गोहणे यांना गोंडवाना विद्यापीठाचे सुवर्णपदक; वणी वकील संघाकडून सत्कार
Next: संविधानावर कोणीही ताशेरे ओढू नये

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.