Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा
  • वणी

राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा

NewWaniDiary 24/12/2024

वणी येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर हा दिवस गणित दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयात गणित दिवसाच्या आयोजन करण्यात आले.


गणित अधिक मनोरंजन व सोप्या पद्धतीने कसा शिकवला जाऊ शकतो व गणित विषय व्यावहारिक जीवनाशी कसा संबंधित आहे हे विविध उपक्रम व कृतिद्वारे याप्रसंगी दर्शविण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अभय पारखी सर होते तर प्रमुख अतिथी म्हणुन मराठी विज्ञान परिषद वणी विभागचे अध्यक्ष प्रा.महादेवराव खाडे होते.त्यांनी
श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर व कार्यावर माहिती दिली. गणितातील विविध संकल्पना सोप्या पद्धतीने सादर करण्यात आल्या विद्यार्थ्यांकडून कोडी उखाणे म्हणी यांच्या साह्याने गणित कसे शिकवल्या जाऊ शकते याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

तसेच अध्यक्षीय मार्गदर्शनान पारखी शिक्षकांनी गणीतातील संबोध सोपे कसे करता येईल व मनोरंजनातुन शिक्षण या बाबीवर प्रकाश टाकला. सर्व विद्यार्थ्यांनी याप्रसंगी उस्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता टोंगे, संचालन तुषार गाणे तर आभार प्रदर्शन श्रेया ढवस यांनी केले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक परिश्रम घेतले.

Continue Reading

Previous: खोटा देखावा आणि फसवणुकीच्या तावडीत
Next: बळीराजा व्याख्यानमाला २०२४ चे आयोजन                           

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.