
वणी (प्रतिनिधी): महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी १७ नोव्हेंबर रोजी वाजत-गाजत भव्य रॅली काढत आपल्या नामांकन अर्जांचा दाखल केला. वणीकरांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी स्वागत केले.

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात संपूर्ण शहर उत्सवमय झाले होते. या प्रसंगी आमदार संजय देरकर, मनसे नेते राजू उंबरकर, काँग्रेस नेते संजय खाडे, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे यांसह शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे या आघाडीतील पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
