
वणी येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या धोरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. भाकपच्या वतीने वणी व झरी येथील मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये स्मार्ट मीटर सक्तीने बसवणे थांबवावे, 2020-21 पासून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी द्यावी आणि शेतीसाठी सौरऊर्जा कनेक्शन ऐच्छिक करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील तहसील कार्यालये व वीज वितरण कार्यालयांवर मोठे मोर्चे काढण्याचा इशारा भाकपचे राज्य कौंसिलर कॉ. अनिल हेपट यांनी दिला.
या निवेदनाच्या वेळी कॉ.अनिल हेपट,अनिल घाटे,वासुदेव गोहणे,पांडुरंग ठावरी,राजु पेंदोर,अथर्व निवडींग,राकेश खामणकर,चंदु निकुरे,हरिच्छंद्र पुनवटकर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
