Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • मुर्धोनी येथे:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप..
  • वणी
  • चळवळ

मुर्धोनी येथे:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप..

NewWaniDiary 09/01/2025

७ फेब्रुवारी २०२५ रोजी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटच्या वतीने,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा, मुर्धोनी येथे विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अशोक कोंगरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कुंदाश्री कुंभलवार (जि.प.उ.प्रा.शाळा), शिक्षक अभय भुजाडे (जि.प.उ.प्रा.शाळा), पूजाताई आंदे(ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुर्धोनी),शकुंतला मुरमाळे (अंगणवाडी सेविका), वृषाली कोरडे(अंगणवाडी सेविका) व आमच्या संघटनेला डोनर म्हणून लाभलेल्या तसेच हितचिंतक ललिता खैरे व यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट चे सदस्य गौरव जवादे, आदित्य वाळके ,अश्विनी अडकिने,अंकिता पथाडे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट चे सदस्य रज्जत सातपुते यांनी केले व आभार प्रेम अडकिने यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करून यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कुंदाश्री कुंभलवार यांनी आपल्याला चांगले शिक्षण घेता यावे यासाठी महामानवांनी किती अथक परिश्रम घेतले म्हनून आपण शिक्षण घेतलेच पाहिजे आणि जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे आपल्या वक्तव्यातून मांडले.आदित्य वाळके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भर टाकत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व अंकिता पथाडे यांनी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटचे ध्येय काय आहे व महापरिनिर्वाणदिनी मिळालेल्या शालेय उपयोगी वस्तूचे वाटप कशा पद्धतीने होईल यावर विश्लेषण करून आपले मनोगत व्यक्त केले तसेच ललिता खैरे यांनी महामानवांचा संघर्ष व आजच्या जगाला शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे हे सांगून आपले मनोगत व्यक्त केले.

यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी आयोजित “एक पेन एक वही” या उपक्रमात आलेल्या शालेयउपयोगी साहित्याचे वाटप शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे मार्गदर्शक हेमंत टिपले व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग तसेच यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट चे सर्व सन्माननीय पदाधिकारी रज्जत सातपुते प्रेम अडकीने, आकाश बोरकर, सुरज खैरे ,काजल वाळके,श्वेता माहुरे, ऋचा दारुंडे,राहुल घोस्की, इस्माईल खान उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वर्गशिक्षकांनी आपला फीडबॅक दिला व मुख्याध्यापक कोंगरे सर यांनी उपक्रमाचे कौतुक करून लेटर पॅड वर वितरित झालेल्या शालेय उपयोगी वस्तूचे लेखी स्वरुपात शुभेच्छा पत्र दिले.

Continue Reading

Previous: आज वणीत माकपचे जिल्हा अधिवेशन..
Next: वणी शहरातील फेमस होटल ‘ताज’ चिकन बिर्याणी..

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.