Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथील; पाच दिवसीय बालसंस्कार शिबिराचे आयोजन..
  • वणी

वणी येथील; पाच दिवसीय बालसंस्कार शिबिराचे आयोजन..

NewWaniDiary 26/05/2025

▪️ शिबिरात बौद्ध संस्कृती, नैतिक मूल्ये, समाजकार्याची जाणीव, आणि मुलांमध्ये चारित्र्य व व्यक्तिमत्त्व विकास यावर मार्गदर्शन..

वणी : भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा वणी यांच्या वतीने माता रमाई स्मृतिदिनानिमित्त दिनांक 27 मे 2025 ते 31 मे 2025 दरम्यान पाच दिवसीय बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर महाप्रज्ञा बुद्धविहार, भिमनगर वणी येथे रोज सकाळी 8.00 ते 12.00 या वेळेत संपन्न होईल.

या शिबिरात 8 ते 13 वयोगटातील मुले-मुलींना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःसोबत वही, पेन व पाण्याची बाटली आणावी.
शिबिरात बौद्ध संस्कृती, नैतिक मूल्ये, समाजकार्याची जाणीव, आणि मुलांमध्ये चारित्र्य व व्यक्तिमत्त्व विकास यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

खाऊची व्यवस्था दानदात्यांच्या सहकार्याने** करण्यात आली आहे. इच्छुक दानदात्यांनी खाऊ देण्यासाठी आपली नावे संयोजकांकडे नोंदवावीत.

संयोजक संपर्क:
मोरेश्वर देवतळे – जिल्हा सरचिटणीस, यवतमाळ (पूर्व) – 9422169076
रमेश तेलंग – जिल्हा संघटक – 8999551746
सचिन वानखेडे – तालुकाध्यक्ष, वणी – 9527498190
प्रविण वनकर – सरचिटणीस, तालुका वणी – 9764577928
सुचिताताई पाटील – तालुकाध्यक्ष, महिला शाखा – 9923461730
वैशालीताई पाटील – सरचिटणीस, तालुका वणी – 9511938715
प्रांजल वनकर – शहर उपाध्यक्ष – 8329046756

खाऊ देणारे दानदाते:
27 मे – आयु. खुशाल काळे
28 मे – आयुनी. कुमुदिनी देवतळे
31 मे – आयुनी. प्रतिक्षा दिप सरादे
  (उर्वरित तारखांसाठी दानदात्यांची नोंद सुरू आहे.)

हा शिबिर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक उत्तम संधी असून, वणी परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांना सहभागी करून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Continue Reading

Previous: वणीतील ‘स्माईल फाऊंडेशन’चा उपक्रम – ‘नवी दृष्टी’तून मोफत नेत्रशस्त्रक्रिया
Next: वणी येथील; ट्रामा केअर सुरू असूनही रुग्णांचे हाल..?

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.