
वणी (प्रतिनिधी) – दिनांक १५ जुलै रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान वणी शहरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग करण्यात आले. या मोहिमेत अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तसेच संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.
तथापि, या कारवाईबाबत स्पष्ट माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. नेमकी कोणती कारवाई झाली, किती दंड आकारण्यात आला याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा पेट्रोलिंग मोहिमा नियमितपणे—किमान एका दिवसाआड—होणे आवश्यक आहे. कारण शहरात मध्यरात्रीपर्यंत बार सुरू असल्याचे चित्र असूनही बार मालकांवर कारवाई होताना दिसत नाही. तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी नागरिकांमध्ये मागणी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात मुख्य चौकात व इतर भागात सतत पेट्रोलिंग करण्याची जोरदार मागणी होत आहे. या विषयावर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
