Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • जनसुरक्षा विधेयक व प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ वणीमध्ये आंदोलन..
  • वणी

जनसुरक्षा विधेयक व प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ वणीमध्ये आंदोलन..

NewWaniDiary 16/07/2025


▪️ संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघासह विविध संघटनांचा सहभाग; हल्लेखोरांवर UAPA अंतर्गत कारवाईची मागणी..


वणी – राज्य सरकारने विधानसभेत सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयक 2025 विरोधात आणि अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे नेते मा. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध पुरोगामी संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी या विधेयकाला लोकशाहीविरोधी ठरवत सांगितले की, यामध्ये सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन आणून सामाजिक कार्यकर्ते, आंदोलक व विरोधकांना दडपण्यासाठी दडपशाहीचा डाव आखत आहे. तसेच गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नाही, तर लोकशाहीविरोधी कट असल्याचा आरोप करण्यात आला.

आंदोलनानंतर वणी येथून गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले असून, हल्लेखोरांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (UAPA), IPC 120B व समाजविघातक कारवायांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन वणी येथे देण्यात आले. अनेक संघटनांनी या निषेधात सहभाग नोंदवून स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला.

संभाजी ब्रिगेडने इशारा दिला की, जर विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभे केले जाईल.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, मराठा सेवा संघाचे अंबादास वागदरकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॅ. अनिल हेपट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, ॲड. अमोल टोंगे, ॲड. दिलीप परचाके, शंकरराव पूनवटकर, दिलीपराव वागदरकर, धीरज भोयर, लक्ष्मण काकडे, वसंत थेटे, सुरेंद्र घागे, बाळासाहेब खैरे, नितीन मोवाडे, कृष्णदेव विधाते, अजय कौरासे, अनिल टोंगे भाऊसाहेब आसुटकर, पंढरी मोहितकर, पांडुरंग किन्हेकर, गजेंद्र भोयर, राहुल खारकर, प्रवीण खानझोडे, संजय तेलंग, अनिल हेपट, मारुती मोडक, मंगेश खामनकर, दिलीप भोयर, विनोद बोबडे, विलास शेरकी, दत्ता डोहे, संजय गोडे,आशिष रिंगोले, आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Continue Reading

Previous: अवघड ठिकाणी जायला शिक्षकांनी तयार व्हावं?
Next: सुजाता थिएटर वणी मे ता.18 जुलै से 🎬 ‘सैयारा’ रोजाना 4 शो मे..

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.