
वणी (प्रतिनिधी): आज दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी वणीतील समाजकार्यात सक्रिय राहिलेले लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे वणी शहरातील सामाजिक, शैक्षणिक व सेवा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मनमिळावू व कार्यतत्पर स्वभावामुळे त्यांचे सर्व स्तरांमध्ये घनिष्ठ संबंध होते.
