Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • बारसमोर युवकाला मारहाण; जखमी चंद्रपूरला हलवला
  • वणी

बारसमोर युवकाला मारहाण; जखमी चंद्रपूरला हलवला

NewWaniDiary 30/09/2025

वणी (प्रतिनिधी) : अंकुशराम उर्फ युवी मोगरे (वय २४, रा. सेवानगर, वणी) या युवकाला वरोरा रोडवरील एका बारसमोर तब्बल आठ-दहा जणांनी मारहाण केली. ही घटना दि. २९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली. काही महिन्यांपूर्वीच युवीचे लग्न झालेले आहे.

युवीच्या मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीतून बचाव करण्यासाठी तो पोलीस स्टेशनकडे धावत निघाला. मात्र त्याचा पिच्छा पुरवत हल्लेखोरांनी पोलीस स्टेशन समोरपर्यंत त्याला मारहाण केली.

जखमी अवस्थेत पोलिसांनी त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर मार लागल्याने तो बेशुद्धावस्थेत असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केले. घटनेची माहिती कळताच अनेक नागरिकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या मारहाणीत सामील असलेल्या काही युवकांना पोलिसांनी अटक केली असून काही फरार आहेत. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Continue Reading

Previous: नवरात्रात दारू दुकाने नियमबाह्य सुरू; नागरिक त्रस्त
Next: वणीतील लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हृदयविकाराने निधन

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.