Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • महाराष्ट्र
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर येथे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न!
  • महाराष्ट्र

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर येथे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न!

NewWaniDiary 17/06/2025

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सोलापूर जिल्ह्यात दिनांक १५ जून रोजी, रविवारला दुपारी १ वा. उपलप मंगल कार्यालय, काटीकर हॉस्पिटलसमोर, सातरस्ता, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. एस. राजिंद्रन कर्नाटक यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. ह्यावेळी संमत करण्यात आलेल्या ठरावाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी वाचन करून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले.

सोलापूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अनेक ठराव मंजूर करण्यात आले. त्यापैकी महत्त्वाचे आठ ठराव-

१) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सभासद नोंदणी मोहीम लवकरच राबविण्यात येणार आहे. चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या सभासद नोंदणीवर आळा घालण्यासाठी आधार कार्ड शिवाय सभासद नोंदणी होणार नाही. तसेच पारदर्शकता कायम राखण्यासाठी कोणताही आर्थिक व्यवहार हा पक्षाच्या नावाने चेक आणि डी.डी. द्वारेच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

२) देशाची राजधानी दिल्लीच्या बॅंक ऑफ बडोदा, पार्लामेंटरी सेंटर बॅंक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावाने खोटे खाते उघडण्यात आले तसेच खोटे पॅनकार्ड काढण्यात आले. यासाठी खोट्या सह्या करण्यात आल्या. या संदर्भात राजेंद्रकुमार, ऍड. मनोज गौतम आणि देसराज यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले असून कोर्टाने यांची जमानत नामंजूर करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी धोकेबाजी कधीही खपवून घेतली जाणार नाही, असे सदर अधिवेशनाव्दारे बजावण्यात आले.

३) इसा हटमॅन, आझाद मैदान मुंबई येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ऐतिहासिक मुख्य कार्यालय मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी तोडण्यात आले त्याचं ठिकाणी नवीन इमारत बांधून वापस करण्यात आले. त्यामुळे पार्टी कार्यालयाचा पत्ता बदलला आहे. यांची कार्यकर्त्यांनी दखल घ्यावी.

४) सोलापूर येथे संपन्न झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनातील स्वागताध्यक्ष जकप्पा कांबळे, सोलापूर यांची महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष म्हणून म्हणून सदर अधिवेशनात निवड करण्यात आली.

५) बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष जिवंत राहावा म्हणून आपल्या पगारातून बाबासाहेबांनी सांगीतल्याप्रमाणे १/ वीसावा हिस्सा प्रत्येक महिन्याला देण्यासाठी उस्फुर्तपणे तयार झालेले प्रा. डॉ. मोरेश्वर रामजी नगराळे रत्नागिरी यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

६) बाबासाहेबांनी स्थापन केलेले समता सैनिक दल हे अगदी सुरुवातीपासून बाबासाहेबांच्या राजकीय आघाडीचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. दरम्यानच्या काळात रिपब्लिकन पक्षाचा फार मोठ्या प्रमाणात अपप्रचार केल्याने कमकुवत रिपाइंचे समता सैनिक दलाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आंबेडकरी चळवळ असा बागुलबुवा उभा करून समता सैनिक दल आपापल्या परीने संचालित करत आहे हे सर्वथ: चुकीचे आहे. म्हणून समता सैनिक दलाची रिपाइंशी संलग्निता कायम ठेवण्यासाठी पुनर्बांधणी करण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला. तसेच समता सैनिक दलाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी संगल्नित करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल अशोककुमार उमरे, गडचांदूर, चंद्रपूर यांचा सोलापूर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

७)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी सगल्नित समता सैनिक दलाच्या पुनर्बांधणीचे काम १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच युवा पिढीला रिपब्लिकन चळवळीची जाणीव जागृती निर्माण करून पुढे चालून नव्या पिढीने रिपब्लिकन पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलण्यासाठी रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला.

८) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आर्थिक फंड मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्याच्या प्रा. अजितसिंघ चहल, हरियाणा, राष्ट्रीय प्रवक्ते यांनी मांडलेल्या ठरावाला राष्ट्रीय अधिवेशनाचा पुर्ण पाठिंबा देण्यात आला.

बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात आम्ही सामील होऊन बाबासाहेबांच्या पार्टीचे काम करीत असल्यामुळे कोणीही या पक्षाचा गट किंवा गवई गट असा उल्लेख करू नये. असे आवाहन राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई यांनी केले.

Continue Reading

Previous: देश अपघातांचा, सरकार घातपाताचं आणि राजकारण आरोप-प्रत्यारोपाचं – सामाजिक चिंतनात्मक लेखातून प्रखर भाष्य
Next: वणी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांवर ठोस उपाययोजना सुरू – आमदार संजय देरकर यांच्या पुढाकाराने नागरिकांमध्ये आशेचा किरण

Related Stories

SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
SAVE_20250816_200833
  • महाराष्ट्र

माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

NewWaniDiary 16/08/2025
SAVE_20250807_132715
  • महाराष्ट्र

फ्रीशीप पोर्टलवरील तृटी दूर करून M.B.B.S. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग खुले करावेत – डॉ. राजेंद्र गवई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

NewWaniDiary 07/08/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.