Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • ताजणे विद्यालय कळमणा (बु.)येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
  • वणी

ताजणे विद्यालय कळमणा (बु.)येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

NewWaniDiary 12/01/2025

3 जानेवारी 2024 रोज शुक्रवारला भास्करराव ताजणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित हायस्कूलचे मुख्याध्यापक ताजणे कार्यक्रमाचे अध्यक्ष हायस्कूलचे शिक्षक दत्तू महाकुलकार, प्रमुख अतिथी शिक्षक प्रफुल गोलाईत व विशेष अतिथी म्हणून शिक्षक राजेश सोयाम उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून कार्यक्रम ला सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषणे देखील सादर केलीत. त्यामधे अर्चिता अगिरकर, अर्जुन चापरे, सुजल मैथिली हंसकर, शारदा मुसळे, भूमिका बोबडे आंदिनी भाषणे दिली.
विशेष अतिथी म्हणून शिक्षक सोयाम यांनी सांगितले की जीवनात सावित्रीबाई फुले यांच्येसारखी जिद्द आणि चिकाटी ठेवली तर कोणतेच ध्येय कठीण नसते व सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. शिक्षक गोलाईत यांनी सावित्रीबाईंचा प्रवास आपल्या मार्गदर्शनातून सांगितला.
अध्यक्षीय भाषण करत असताना शिक्षक महाकुलकर यांनी सांगितले की शाळा सुरू करण्यासाठी सावित्रीबाईंना येणाऱ्या अडचणी व ज्योतिबा फुलेनी दिलेली हिम्मत यावर बोलत कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली गोहोकार तर आभार समीक्षा हिने मानले
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता योगेश किनाके, किशोर ढवस, ऋतुजा गोहोकार, गायत्री बोरकर, प्रीती भोयर आदींनी सहकार्य केले.

Continue Reading

Previous: वणी तालुक्यातील: जल जीवन मिशन योजनेच्या विकास नावाखाली हजारो कोटी रुपयाचा खेळखंडोबा झाल्याचे – आ. संजय देरकर यांच्या आरोप
Next: समाजात घडणाऱ्या घटनांपासून विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे – गणेश किंद्रे (उपविभागीय पोलीस अधिकारी,वणी)

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.