▪️ या कार्यक्रमातील स्वामी भक्तांसह शेकडो महिला-पुरुष महाप्रसादाला उपस्थित..

वणी : शहरातील दि.31 मार्च रोजी, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर समितीच्या वतीने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांसह शेकडो महिला-पुरुष महाप्रसादाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाआधी, स्व. पारसमल चोरडिया फाऊंडेशन वणी आणि विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून वणी तालुक्यातील गोरगरीबांसाठी नेत्रदान शिबीर आणि कॅन्सर शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

विजयबाबू चोरडिया यांनी आपल्या सामाजिक कार्यात गोरगरीबांना मदत केली असून धार्मिक सणांच्या आयोजनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
